🌹 ** कवितेच्या गावात * *🌹
मी कवितेच्या गावात
शब्द शोधीत गेलो
शब्दांच्या संगतित
काव्यगान सांडीत गेलो.
*******************
******जयवंत भुजबल ( रेल्वे पुणे)..
🌹 ** कवितेच्या गावात * *🌹
मी कवितेच्या गावात
शब्द शोधीत गेलो
शब्दांच्या संगतित
काव्यगान सांडीत गेलो.
*******************
******जयवंत भुजबल ( रेल्वे पुणे)..
-शब्दांचे चांदणे उधळीत
कविता नाचते नभागणांत
मी शब्द विखरतो चांदण्यात
तेव्हा कविता कोरते मनात
******जयवंत भुजबल ( रेल्वे पुणे)..
खरच गं कळत मला …….……. ?
खरच गं कळत मला माझं मन सांगत नाही तुला …….?
पंरतु तुझ्या मनापर्यंत पोहचण्यइतका वेळच देत नाही तुला ?
सकाळी उठताच माझ्या हाती वृत्तपत्र असतं,
तुला मात्र किचन मधल कामच आधी दिसतं
हातात टीव्ही चा रिमोट, चहाचा कप ऑफिससाठी
आवरण्याचा तुझा वेगळाच थाट असतो …
तुला सगळ आवरण्यात श्वासही घ्यायला वेळ नसतो ….
सकाळच्या या गडबडीत तुला उसंत मिळत नाही …
खरच गं कळत मला …….……. ?
संध्याकाळी मी ऑफिस मधून दमून घरी येतोस …
मलाही तुझ्यासारखच दिवसभर काम असत
मात्र तू अगदी साफ विसरतेस ……
रात्रीचा स्वयंपाक , सकाळीची तयारी माझी नुसती बडबड
धावपळ सुरु असते ……
स्वतः बद्दलही विचार करायला ही फुरसत नाही
कुठे असते ?
तक्रार नाही रे, पण सगळ म्यानेज करताना मला पुरेशी
झोपही मिळत नाही …
खरच गं कळत मला …….……. ?
सुट्टीचा दिवस म्हणजे हक्काच्या विश्रांतीचा दिवस
असतो …
तुला मात्र आठवड्याच्या कामाचा हिशोब पहायचा असतो …
त्यातच पाहुणे - मित्र याचं येण , तुझ्यासाठी कामचकाम
सजा असते ….
माझ्यासाठी मात्र ती सुट्टीच्या दिवशीही त्या टाईम ची सजा असते
खरच गं कळत मला …….……. ?
तू खूप काही मदत करावीस माझी अपेक्षा असते ….
वाईट फक्त वाटत जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल ,
माझ्या कामाबद्दल बेफिकिरी दिसते …
मला वाटत निदान माझ्या कामाची , ते करण्यामागच्या
प्रेमाची जाणीव असावी …
आणि थोडी का होईना माझ्या डोळ्यात नसते पण माझ्या मनात
काळजी असते ….
समजून घे मला , फक्त साड्या आणि दागिन्याचाच
आनंद देत नाही …
खरच गं कळत मला …….……. ?
जयवंत ज्ञानेश्वर भुजबल,
सह्यादी रेसीडेन्सी
सर्वे नंबर 27/1/1/8
कात्रज ,पुणे 411046
वैश्वीकरण में पेड
पेड के तने में बसी
मानव की आत्मा
टहलीयों में दौडता है,
हरी हरी संपत्ती
हर पत्ते-पत्ते में
फैलाती है सांसें
फुलों में महकता है
आदमी का जीवन
पर्वत पहाड तोडकर
अपने को ही काटता है।
पेड पौधे बेलियों को
कुचलता है
वैश्वीकरण में
आदमी भविष्य को
काटता है आदमी
एक घर के लिए
उजाडता है पूरा वन
वृक्षों को रहने दो
भविष्य को न
निगलने दो।
जयवंत ज्ञानेश्वर भुजबल,
सह्यादी रेसीडेन्सी
सर्वे नंबर 27/1/1/8
कात्रज ,पुणे 411046
घायाळ माणुसकी
केली माणुसकी घायाळ आता
सोडवू कैसा हा पेच कैसे आता ?
फितुर झाली माणुसकी क्रूरतेला
मान घालून घायाळ का आता ?
रक्तरंजित इतिहास जुना आहे
रक्ताची चटक श्वापदांना आहे ?
दु:खितांना सांभाळावे कैसे आता
दशहत वाद्यांना जरब नसे आता ?
प्रार्थना आता रामरहिम येशूला
माणसांची माणुसकीला उजळे आता
प्रत्येक युगात तू अवतरला
प्रतिक्षेचा काळ हा का लांबवला ?
जयवंत ज्ञानेश्वर भुजबल
सहयाद्री रेसि., सर्वे नं. 27/1/1/8
ब्लू हेवन स्कूल, जवळ, कात्रज, पुणे-46
अंबेचा जोगवा
जगद अंबे तुला पूजितो
जोगवा मागतो गं अंबे
जोगवा मागतो ।। धृ ।।
हास्य भविष्य सदा मांगल्याचे
आरोग्य सर्वांना लाभू दे
ज्ञानवंत गुणवंत शैशव आमुचे
सदैव सुखात राहू दे।
अंबेचा जोगवा
जगद अंबे तुला पूजितो
जोगवा मागतो गं अंबे
जोगवा मागतो ।। धृ ।।
सदविचाराचे, मांगल्याचे, दान मागतो
जोगवा मागतो ।। धृ ।।
जग सुधारनार्थ, सेवा घडूदे
गोरगरीबांकरीता आमुचे
हातुन कल्याण घडू दे
सेवा समतेचे दान मागतो
जोगवा मागतो ।। धृ ।।
जगद अंबे तुला पूजितो
जोगवा मागतो गं अंबे
जोगवा मागतो ।। धृ ।।
मनोमनी देशसेवेची ज्योत तेवू दे
रक्ता रक्ताच्या थेंबातून
देशभक्तिचे दर्शन घडू दे
देश कल्याणाचे दान मागतो
अंबेचा जोगवा
जगद अंबे तुला पूजितो
जोगवा मागतो गं अंबे
जोगवा मागतो ।। धृ ।।
जयवंत ज्ञानेश्वर भुजबल
सहयाद्री रेसि., सर्वे नं. 27/1/1/8
ब्लू हेवन स्कूल, जवळ, कात्रज, पुणे-46
आता तरी दारू सोड
तुला लागलं दारुचं वेड
संसारी झाली तेड
सोन्याची केली मोड
आता तरी दारू सोड llध्रुll
दारूने केली ताटातूट
घराची लागली वाट
दारीद्र्याचं साम्राज्य अफाट
आता तरी सोड दारुची वाट ll१ll
तू सोडलीस सारीच लाज
पुन्हा पीऊन आलास आज
सोडले सगळे कामकाज
आता तरी सोड दारुबाज ll२ll
दारूचा हा सारा खेळ
कुठे बसेना रे मेळ
आतड्याला बसतोय पीळ
आता तरी दारू सोड सर्व दारूचा घोळ ll३ll
कच्ची-बच्ची आहे रे सान
बायको करतीया सहन
जीवाचं करूनी रान
आता तरी सोड दारूची घान ll४ll
संसाराची घडी विस्कटली
दारूनं नोकरी सुटली
सगळी नाती तुटली
आता तरी सोड दारूची बाटली ll५ll
-जयवंत भुजबळ मो. : 9422530373 kavibhujbal@gmail.com