मंगलवार, 8 जून 2021

कवितेच्या गावात

 🌹  ** कवितेच्या गावात  * *🌹

मी  कवितेच्या गावात

शब्द शोधीत   गेलो

शब्दांच्या संगतित

काव्यगान  सांडीत गेलो.

*******************

******जयवंत भुजबल ( रेल्वे पुणे)..


शब्दांचे चांदणे उधळीत

 -शब्दांचे चांदणे  उधळीत

कविता नाचते नभागणांत

मी  शब्द  विखरतो   चांदण्यात

तेव्हा कविता कोरते मनात

******जयवंत भुजबल ( रेल्वे पुणे)..


खरच गं कळत मला …….……. ?

 खरच गं कळत मला …….……. ?

खरच गं कळत मला माझं  मन सांगत नाही तुला …….?

पंरतु तुझ्या मनापर्यंत पोहचण्यइतका वेळच देत  नाही तुला ?

 

सकाळी उठताच माझ्या हाती वृत्तपत्र असतं,

तुला मात्र किचन मधल कामच आधी दिसतं 

हातात टीव्ही चा रिमोट, चहाचा कप ऑफिससाठी 

आवरण्याचा तुझा वेगळाच थाट असतो …

तुला सगळ आवरण्यात श्वासही घ्यायला वेळ नसतो …. 

सकाळच्या या गडबडीत तुला उसंत मिळत नाही … 

खरच गं कळत मला …….……. ?


संध्याकाळी मी ऑफिस मधून दमून घरी येतोस …

मलाही तुझ्यासारखच दिवसभर काम असत  

मात्र तू  अगदी साफ विसरतेस …… 

रात्रीचा स्वयंपाक , सकाळीची तयारी माझी नुसती बडबड 

धावपळ सुरु असते …… 

स्वतः बद्दलही विचार करायला ही    फुरसत  ना‍ही

कुठे असते ?

तक्रार नाही रे, पण सगळ म्यानेज करताना मला पुरेशी 

झोपही मिळत नाही …

खरच गं कळत मला …….……. ?


सुट्टीचा दिवस म्हणजे हक्काच्या विश्रांतीचा दिवस 

 असतो …

तुला मात्र आठवड्याच्या कामाचा हिशोब पहायचा असतो … 

त्यातच पाहुणे - मित्र याचं येण , तुझ्यासाठी  कामचकाम 

सजा असते …. 

माझ्यासाठी मात्र ती सुट्टीच्या दिवशीही त्‍या टाईम ची सजा असते 

 

खरच गं कळत मला …….……. ?


तू खूप काही मदत करावीस   माझी अपेक्षा असते …. 

वाईट फक्त वाटत जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल ,

माझ्या कामाबद्दल बेफिकिरी दिसते …

मला वाटत निदान   माझ्या कामाची , ते करण्यामागच्या 

प्रेमाची जाणीव असावी …

आणि  थोडी का होईना माझ्या डोळ्यात नसते पण  माझ्या मनात

काळजी असते …. 

समजून घे मला , फक्त साड्या आणि दागिन्याचाच 

  आनंद देत नाही …

खरच गं कळत मला …….……. ?



जयवंत ज्ञानेश्‍वर भुजबल,

सह्यादी रेसीडेन्‍सी

सर्वे नंबर 27/1/1/8

कात्रज ,पुणे 411046 










वैश्‍वीकरण में पेड

 


वैश्‍वीकरण में पेड

पेड के तने में बसी

मानव की आत्‍मा

टहलीयों में दौडता है,

हरी हरी संपत्‍ती

हर पत्‍ते-पत्‍ते में

फैलाती है सांसें

फुलों में महकता है

आद‍मी का जीवन

पर्वत पहाड तोडकर

अपने को ही काटता है।

पेड पौधे बेलियों को

कुचलता है

वैश्‍वीकरण में

आदमी भविष्‍य को

काटता है आदमी

एक घर के लिए

उजाडता है पूरा वन

वृक्षों को रहने दो

भविष्‍य को न

निगलने दो।

जयवंत ज्ञानेश्‍वर भुजबल,

सह्यादी रेसीडेन्‍सी

सर्वे नंबर 27/1/1/8

कात्रज ,पुणे 411046 


घायाळ माणुसकी

 घायाळ माणुसकी

केली माणुसकी घायाळ आता

सोडवू कैसा हा पेच कैसे आता ?

फितुर झाली माणुसकी क्रूरतेला

मान घालून घायाळ का आता ?

 

रक्‍तरंजित इतिहास जुना आहे

रक्‍ताची चटक श्‍वापदांना आहे ?

 

दु:खितांना सांभाळावे कैसे आता

दशहत वाद्यांना जरब नसे आता ?

 

प्रार्थना आता रामरहिम  येशूला

माणसांची माणुसकीला उजळे आता

 

प्रत्‍येक युगात तू अवतरला

प्रतिक्षेचा काळ हा का लांबवला ?

 

 

 

 जयवंत ज्ञानेश्‍वर भुजबल

सहयाद्री रेसि., सर्वे नं. 27/1/1/8

ब्‍लू हेवन स्‍कूल, जवळ, कात्रज, पुणे-46


अंबेचा जोगवा

अंबेचा जोगवा

जगद अंबे तुला पूजितो

जोगवा मागतो गं अंबे

जोगवा मागतो ।। धृ ।।

हास्‍य भविष्‍य सदा मांगल्‍याचे

आरोग्‍य सर्वांना लाभू दे

ज्ञानवंत गुणवंत शैशव आमुचे

सदैव सुखात राहू दे।

अंबेचा जोगवा

जगद अंबे तुला पूजितो

जोगवा मागतो गं अंबे

जोगवा मागतो ।। धृ ।।

सदविचाराचे, मांगल्‍याचे, दान मागतो

जोगवा मागतो ।। धृ ।।

जग सुधारनार्थ, सेवा घडूदे

गोरगरीबांकरीता आमुचे

हातुन कल्‍याण घडू दे

सेवा समतेचे दान मागतो

जोगवा मागतो ।। धृ ।।

जगद अंबे तुला पूजितो

जोगवा मागतो गं अंबे

जोगवा मागतो ।। धृ ।।

 

मनोमनी देशसेवेची ज्‍योत तेवू दे

रक्‍ता रक्‍ताच्‍या थेंबातून

देशभक्तिचे दर्शन घडू दे

देश कल्‍याणाचे दान मागतो

अंबेचा जोगवा

जगद अंबे तुला पूजितो

जोगवा मागतो गं अंबे

जोगवा मागतो ।। धृ ।।

 

 

जयवंत ज्ञानेश्‍वर भुजबल

सहयाद्री रेसि., सर्वे नं. 27/1/1/8

ब्‍लू हेवन स्‍कूल, जवळ, कात्रज, पुणे-46

Meri Paheli Kavita आता तरी दारू सोड

आता तरी दारू सोड  

तुला लागलं दारुचं वेड

संसारी झाली तेड

सोन्‍याची केली मोड

आता तरी दारू सोड llध्रुll

दारूने केली ताटातूट

घराची लागली वाट

दारीद्र्याचं साम्राज्‍य अफाट

आता तरी सोड दारुची वाट ll१ll

तू सोडलीस सारीच लाज

पुन्हा पीऊन आलास आज

सोडले सगळे कामकाज

आता तरी सोड दारुबाज ll२ll

दारूचा  हा सारा खेळ

कुठे बसेना रे मेळ

आतड्याला बसतोय पीळ

आता तरी दारू सोड सर्व दारूचा घोळ ll३ll

कच्ची-बच्ची आहे रे सान

बायको करतीया सहन

जीवाचं करूनी रान

 आता तरी सोड दारूची घान ll४ll

संसाराची  घडी विस्‍कटली

दारूनं  नोकरी सुटली

सगळी नाती तुटली

आता तरी सोड दारूची बाटली ll५ll

                                                                    -जयवंत भुजबळ मो. : 9422530373                            kavibhujbal@gmail.com

 



कविता देश सेवा

 कविता देश सेवा jay


देश सेवा


आली करोना महामारी 

लेकरू जरी घरी .. ! 

माय ड्यूटी करी

जरी आली घरी

आई त्या लेकराला घेईना .. !! 


असं विदारक हे पाहवेना 

डोळ्यातले पानी थांबेना .. ! 

घरातून पाय निघेना

वाट पाहे दवाखाना

रडत असे तान्हा .. !! 


लहान पिल्लू सोडेना

गरज आहे रुग्णांना!

पिलांचा चेहरा जाईना

हृदयातल्या पीळ सुटेना

का आला हा करोना.!!


सर्व वैतागले लॉक डाऊनला

डॉक्टर नर्स पोलीस तैनातीला .. ! 

रेल्वे आहे आधाराला

नित्यसेवा देती देशाला

करोना वॉरियर्स साथिला..!!


हरवा या महामारीला

पर्वा नाही जीवाला!

लगाम घाला सवयीला

काळजी सर्व जगाला

हरवा आता करोनाला!!


प्रणाम माझा रुग्णसेवेला  

नमन सर्वांच्या त्यागाला!

वेगळं केलं जगाला

साथ हवी हरवायला

चला हरवू करोनाला!!


                     -जयवंत ज्ञानेश्वर भुजबळ

                       मो.क्र.9422530373

                        20 may2020


कविता -निळे छत

  निळे छत 👌


 निळे छत

 हे कुणाचे आहे?

 काय जो पाहतो

 त्याचे आहे


 दिवसभर

 निळा रंग 

 रात्री तयाला

  काळे कोण करतो?


 उन्हात तजेला

 रात्रीला कोण

आकाशात

 तारे सजवतात?


 किती पक्षी?

 छत्रीखाली

 कोणत्या गावी

 विचार करी?


 पाऊस येतो

 ढग काळा रंग

 छत्रीशी खेळत

 पावसात दंग


 इंद्रधनु उमटले

 सात रंग प्रकटले

 किरणांपासून

 सर्व घडले


 जयवंत भुजबळ, कात्रज, पुणे4.4.21