मंगलवार, 8 जून 2021

घायाळ माणुसकी

 घायाळ माणुसकी

केली माणुसकी घायाळ आता

सोडवू कैसा हा पेच कैसे आता ?

फितुर झाली माणुसकी क्रूरतेला

मान घालून घायाळ का आता ?

 

रक्‍तरंजित इतिहास जुना आहे

रक्‍ताची चटक श्‍वापदांना आहे ?

 

दु:खितांना सांभाळावे कैसे आता

दशहत वाद्यांना जरब नसे आता ?

 

प्रार्थना आता रामरहिम  येशूला

माणसांची माणुसकीला उजळे आता

 

प्रत्‍येक युगात तू अवतरला

प्रतिक्षेचा काळ हा का लांबवला ?

 

 

 

 जयवंत ज्ञानेश्‍वर भुजबल

सहयाद्री रेसि., सर्वे नं. 27/1/1/8

ब्‍लू हेवन स्‍कूल, जवळ, कात्रज, पुणे-46


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें