खरच गं कळत मला …….……. ?
खरच गं कळत मला माझं मन सांगत नाही तुला …….?
पंरतु तुझ्या मनापर्यंत पोहचण्यइतका वेळच देत नाही तुला ?
सकाळी उठताच माझ्या हाती वृत्तपत्र असतं,
तुला मात्र किचन मधल कामच आधी दिसतं
हातात टीव्ही चा रिमोट, चहाचा कप ऑफिससाठी
आवरण्याचा तुझा वेगळाच थाट असतो …
तुला सगळ आवरण्यात श्वासही घ्यायला वेळ नसतो ….
सकाळच्या या गडबडीत तुला उसंत मिळत नाही …
खरच गं कळत मला …….……. ?
संध्याकाळी मी ऑफिस मधून दमून घरी येतोस …
मलाही तुझ्यासारखच दिवसभर काम असत
मात्र तू अगदी साफ विसरतेस ……
रात्रीचा स्वयंपाक , सकाळीची तयारी माझी नुसती बडबड
धावपळ सुरु असते ……
स्वतः बद्दलही विचार करायला ही फुरसत नाही
कुठे असते ?
तक्रार नाही रे, पण सगळ म्यानेज करताना मला पुरेशी
झोपही मिळत नाही …
खरच गं कळत मला …….……. ?
सुट्टीचा दिवस म्हणजे हक्काच्या विश्रांतीचा दिवस
असतो …
तुला मात्र आठवड्याच्या कामाचा हिशोब पहायचा असतो …
त्यातच पाहुणे - मित्र याचं येण , तुझ्यासाठी कामचकाम
सजा असते ….
माझ्यासाठी मात्र ती सुट्टीच्या दिवशीही त्या टाईम ची सजा असते
खरच गं कळत मला …….……. ?
तू खूप काही मदत करावीस माझी अपेक्षा असते ….
वाईट फक्त वाटत जेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल ,
माझ्या कामाबद्दल बेफिकिरी दिसते …
मला वाटत निदान माझ्या कामाची , ते करण्यामागच्या
प्रेमाची जाणीव असावी …
आणि थोडी का होईना माझ्या डोळ्यात नसते पण माझ्या मनात
काळजी असते ….
समजून घे मला , फक्त साड्या आणि दागिन्याचाच
आनंद देत नाही …
खरच गं कळत मला …….……. ?
जयवंत ज्ञानेश्वर भुजबल,
सह्यादी रेसीडेन्सी
सर्वे नंबर 27/1/1/8
कात्रज ,पुणे 411046
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें