आता तरी दारू सोड
तुला लागलं दारुचं वेड
संसारी झाली तेड
सोन्याची केली मोड
आता तरी दारू सोड llध्रुll
दारूने केली ताटातूट
घराची लागली वाट
दारीद्र्याचं साम्राज्य अफाट
आता तरी सोड दारुची वाट ll१ll
तू सोडलीस सारीच लाज
पुन्हा पीऊन आलास आज
सोडले सगळे कामकाज
आता तरी सोड दारुबाज ll२ll
दारूचा हा सारा खेळ
कुठे बसेना रे मेळ
आतड्याला बसतोय पीळ
आता तरी दारू सोड सर्व दारूचा घोळ ll३ll
कच्ची-बच्ची आहे रे सान
बायको करतीया सहन
जीवाचं करूनी रान
आता तरी सोड दारूची घान ll४ll
संसाराची घडी विस्कटली
दारूनं नोकरी सुटली
सगळी नाती तुटली
आता तरी सोड दारूची बाटली ll५ll
-जयवंत भुजबळ मो. : 9422530373 kavibhujbal@gmail.com
कविता जी यदि आपको ब्लॉग बनाने या हिंदी में पोस्ट लिखने में कोई दिक्कत है, तो मैं आपकी मदद कर सकता हूँ। मेरा उद्देश्य इंटरनेट जगत में हिंदी का प्रचार- प्रसार करना और हिंदी प्रेमियों को तकनीकी सहायता उपलब्ध कराना है।
जवाब देंहटाएं